‘रघुपती राघव राजाराम’ काँग्रेसचे राम मंदिरातील चोरी प्रकरणी अनोखे आंदोलन

राम मंदिरा मधील कथीत दान चोरी प्रकरणी केला निषेध

अयोध्या येथील श्री राम मंदिर मधील दानपेटीतील दान चोरी प्रकरणाबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज कणकवली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘रघुपती राघव राजाराम’ कार्यक्रमाचे (आंदोलन) आयोजन करण्यात आले.
​ या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अयोध्या येथील कथित दान चोरी प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार हे पाऊल उचलण्यात आले.
​या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर , जिल्हा सरचिटणीस प्रविण वरुणकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच महेश तेली, निलेश मालडंकर, संतोष टक्के, आतिश जेठे, भालचंद्र जाधव , प्रदिपकुमार जाधव,जेम्स फर्नांडिस ,यांच्या सह कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले होते.

error: Content is protected !!