कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट

वाढदिवसानिमित्त नारायण राणे व नीलम राणे यांनी दिल्या संदेश पारकर यांना शुभेच्छा

संदेश पारकर यांच्या राणेंशी झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

कणकवली चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांची कणकवलीतील ओम गणेश या निवासस्थानी भेट घेतली यावेळी खासदार नारायण राणे यांनी संदेश परकर यांना शुभेच्छा दिल्या. तसेच नीलम राणे यांनी देखील संदेश पारकर यांना शुभेच्छा देत आशीर्वाद दिले. संदेश पारकर हे यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख होते. मात्र तूर्तास त्यांच्याकडे पक्षीय कोणतेही पद नसताना नगराध्यक्ष झाल्यानंतर पारकर यांचीही नारायण राणे यांच्याशी झालेली दुसरी भेट असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय घडामोडी येत्या काळात वेग घेण्याची देखील चर्चा सुरू झाली आहे.

error: Content is protected !!