आज हळवल येथे”सर्वांसाठी योग”

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि कामगार कल्याण केंद्र कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त” सर्वांसाठी योग”या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
आज संध्याकाळी पाच वाजता नीलायम द ब्ल्यू बॉक्स या उदय पंडित यांच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्वांसाठी योग या विषयावर योगासनांची माहिती देऊन प्रात्यक्षिकांसह हे सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. तरीही हा योग दिन साजरा करण्यासाठी आणि योग आपल्या जीवनात काय सकारात्मक बदल करू शकतो हे जाणून घेण्यासाठी नागरिकांनी या कार्यक्रमाला सहकुटुंब मित्रपरिवारासह उपस्थित रहावे असे आवाहन योग वल्लरी योग शिक्षण वर्गाच्या योग शिक्षिका सौ ज्योती पंडित यांनी केले आहे.
कणकवली प्रतिनिधी