सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारूच्या किमती कमी करा मागणी मुख्यमंत्र्यांच्या समोर सावंतवाडी मध्ये ठेवणाऱ्या शिक्षण मंत्र्यांना म्हणावे तरी काय???

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
सावंतवाडी प्रतिनिधि
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारूच्या किमती कमी अशी मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर सावंतवाडी मध्ये ठेवणाऱ्या शिक्षण मंत्र्यांना म्हणावे तरी काय? अशी जोरदार टीका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दारूच्या किमती कमी करा म्हणून सांगत आहेत, असा शिक्षण मंत्री या शिक्षण मंत्र्यांचा आदर्श मुलांनी काय ठेवावा, गॅस सिलेंडरच्या किमती चौपट वाढलेले आहेत .माता माता भगिनींचे अश्रू पुसावे असे वाटले नाही ते या शिक्षण मंत्र्यांना समस्त मध्यमवर्गीय आणि गरीब जनता महागाईने होरपळत आहे. रोजचं घर चालवणे त्यातच एखाद्या आजारपण आलं तर त्याचा खर्च लाईट बिल पाणी बिल शाळेची मुलांचे खर्च या खर्चामध्ये जनता अक्षरशा मेटाकुटीला कुठला आली आहे. जीवनात आवश्यक वस्तूंचे भाव कमी करा म्हणून कधी आंदोलन कधी प्रश्न मांडण्याचे शिक्षण मंत्र्यांनी शासन दरबारी प्रश्न मांडल्याचे जनतेला हस्तगत दिसलेले नाही .परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारूचे किमती कमी करा धोरण ठरवा ही मागणी दीपक केसरकर करताना महिला भगिनींनी काय समजावं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक पत्रकार आणि संस्था दारू आणि आम्लप पदार्थाच्या विरोधात आवाज उठवत असताना महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आणि भाषा मंत्री दारूच्या किमती कमी करण्यासाठी आपलं वजन खर्च करत आहे. यापेक्षा शरमेची बाब कोणती अनेक प्रश्न या जिल्ह्याचे आहे .ते प्रश्न मंत्री दीपक केसरकर यांनी सोडविण्यासाठी आंदोलन किंवा प्रश्न विचारण्याची जनतेला दिसलेलं नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारूचे किमती कमी करण्यासाठी वजन वापरणाऱ्या शिक्षण आणि भाषा मंत्री यांचे तीव्र निषेध करत आहोत .हा प्रश्न विरोधी पक्ष लावून धरायला उठाव करायला विरोधी पक्ष कमी पडल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षाने एकत्रित या प्रश्नावरती गावा गावात चौकात चौकात निषेध करायला हवा या प्रश्नावर ती सर्व विरोधी पक्ष जिल्हाध्यक्ष मी एकत्रित बैठक घेऊन जिल्ह्याचा कार्यक्रम ठराव असं मला वाटतं. अस मत प्रसिध्दी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.