शिवसेने च्या वर्धापनदिन निमित्ताने खारेपाटण येथे वृक्षारोपण

—खारेपाटण शिवसेना विभाग यांचा उपक्रम
येत्या सोमवारी 19 जून रोजी शिवसेनेचा 57 वा स्थापना दिवस आहे . यानिमित्ताने खारेपाटण येथे वृक्षारोपण करण्यात आले.खारेपाटण शिवसेना विभाग यांच्या वतीने हे वृक्षारोपण करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जोपासत खारेपाटण येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना वर्धापनदिन साजरा करण्यात आल्याने त्यांचे समाजातून कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच खारेपाटण मध्ये अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सरपंच प्राची इसवलकर ,युवा सेना जिल्हा प्रमुख सुकांत वरुणकर, शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, ग्रामपंचायत सदस्य गुरू शिंदे. अस्थालि पवार ,सुधाकर ढेकणे
डॉ प्रिया वडाम आणि देवानंद इसवलकर यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण