कलमठ मधील विज समस्यांची कामे मार्गी लावण्यास सुरुवात

युवा सेनेच्या वतीने कार्यकारी अभियंत्यांकडे करण्यात आली होती मागणी
कलमठ ग्रामस्थांमधून या कामाबद्दल समाधान व्यक्त
उद्धव बाळासाहेब ठाकरे , युवासेना कलमठ यांच्या वतीने महावितरण चे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनाची दाखल घेऊन पावसाळ्यापूर्वी कलमठ गावातील विद्युत जीर्ण पोल, तारांवरील झाडी, जीर्ण तारा बफळण्याचे काम सोमवार पासून सुरु करण्यात आली. यामुळे युवासेनेने दिलेल्या केलेल्या मागणीला यश आले असून, कलमठ मधील वीज समस्यां सुटण्यासाठी याची मदत होणार आहे. युवा सेनेने केलेल्या कामा बद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी उर्वरित मार्गी लावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती युवासेना विभाग प्रमुख अनुप वारंग यांनी दिली.
दिगंबर वालावलकर /कणकवली