सत्यशोधक विद्यार्थी संघटना व सत्यशोधक शिक्षक सभा सिंधुदुर्ग संयुक्त कृती समितीच्यानेतृत्वाखाली सावंतवाडी प्रांतकार्यालयावर काढण्यात आला शिक्षण अधिकार मोर्चा

परजिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांमुळे निर्माण झालेल्या जि. प. शाळांतील रिक्त जागांवर शिक्षक भरती तातडीने करण्यात यावी
सावंतवाडी दि.१२( प्रतिनिधी)
सत्यशोधक विद्यार्थी संघटना व सत्यशोधक शिक्षक सभा सिंधुदुर्ग संयुक्त कृती समितीच्यानेतृत्वाखाली सावंतवाडी प्रांत कार्यालयावर शिक्षण अधिकार मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला सावंतवाडी, कुडाळ तालुक्यातील महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. परजिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांमुळे निर्माण झालेल्या जि. प. शाळांतील रिक्त जागांवर शिक्षक भरती तातडीने करण्यात यावी, मुलींना १२ वी पर्यंत मोफत सिक्षणाच्या सरकारच्या धोरणाची महाविद्यालयांनी कडक अंमलबजावणी करावी,, मागासवर्गीय मुलांना शिष्यवत्ती मार्गदर्शनासाठी प्रत्येक महाविद्यालयात मार्गद्रन केंद्र सुरु करावी. मागासवर्गीय मुलांकडून महाविद्यालय प्रवेशावेळी शिष्यवृत्तीधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून कोणतेही शूल्क वसूल करु नये, ज्या महाविद्यालयांतून शिष्यवृत्तीसाठी आवेदने भरली जाणार नाहीत त्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी आदी, मांगण्या घेवून हा मोर्चा काढण्यात आला होता.
साकाळी ११ वाजता सावंतवाडीतील समाजमंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला सुरुवात करण्यात आली .मोर्चाचे नेतृत्व सत्यशोधक शिक्षक सभेचे जिल्हासचिव शंकर जाधव, विद्यार्थी नेत्या सानिया जाधव, कोमल आडेलकर, सानिका जाधव , सुजय जाधव व समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कांबळे यांनी केले. तसेच सावंतवाडीतील आंबेडकर चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते व पत्रकार मोहन जाधव तसेच जेष्ठ कार्यकर्त्या भावना कदम याही या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
मोर्चा समाजमंदिरकडून संपूर्ण बाजारपेठेतून जि.प.शाळांत शिक्षक भरती झालीच पाहिजे, मुलींना १२ वी पर्यंत मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे., मागासवर्गीय विद्यार्थांना मोफत प्रवेश मिळालाच पाहिजे, शिष्यवृत्ती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची ! अशा अनेक गगनभेदी घोषणा देत कडाक्याच्ा उन्हात हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. येथे मोर्चाचे सभेत रिपांतर करण्यात आले. यावेळी अंकुश कदम यांनी मोर्चाच्या मागण्यासंदर्भात भूमिका मांडली. त्यानंतर जिल्हासचिव शंकर जाधव, सानिया जाधव, कोमल आडेलकर व भावना कदम यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले.यासभेत नांदेड येथी अक्षय भालेराव याच्या जातीय हत्येचा निषेधही करण्यात आला.
त्यानंतर नायब तहसिलदार बांदेकर यांच्यासी मोर्चाच्या शिष्टमंडळाने मोर्च्याच्या मागण्यांचे निवेदन देवून सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला. यावेळी सावंतवाडी पोलिस उपनिरिक्षक अमित गोते व त्यांच्या सहका-यांनी मोर्चा सुरळित पार पडण्यासाठी मौलिक सहकार्. केल्याबद्द्ल आभार मानण्यात आले.