कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम यांच्या शिल्लक भितीच्या गर्भकोशातून या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग आयोजित, हेतकर पब्लिकेशनने कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहातझाले सपन्न

सावंतवाडी

इतिहास हा मानवनिर्मित असतो. मात्र तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित व्हावा लागतो. म्हणूनच तो समजून घ्यायचे समाजभानही असावे लागते. स्नेहा कदम यांच्या काव्यसंग्रहातून सामाजिक व सांस्कृतिक विषमतेचा हुंकार प्रतिबिंबीत होतो. तो हुंकार संत जनाबाईंच्या कवितांचे साधर्म्य सांगणारा असल्याचे प्रतिपादन जेष्ठ कवयित्री तथा मुंबई विद्यापिठाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. वंदना महाजन यांनी रविवारी येथे केले.
डॉ. महाजन यांच्या हस्ते नव्या दमाच्या कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम यांच्या शिल्लक भितीच्या गर्भकोशातून या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग आयोजित, हेतकर पब्लिकेशनने कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात रविवारी पार पडले. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरूवात महामानवाच्याप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यावेळी त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सम्यक साहित्य संसदचे अध्यक्ष सुनिल हेतकर हे होते. यावेळी प्रा. डॉ. शरयू आसोलकर, प्रा. सिमा हडकर, कवि राजेश कदम, कवयित्री स्नेहा कदम, प्रविण बांदेकर, संदिप परब, चंद्रकांत जाधव, कल्पना बांदकेर, अनिल जाधव, संध्या तांबे, सिद्धार्थ तांबे, प्रविण, बाळ आजगांवकर इत्यादी उपस्थित होते.
यावेळी कवयित्री स्नेहा कदम यांनी काव्यसंग्रहाबाबत आपले मनोगत व्यक्त करून समाजात घडणाऱ्या, आपल्याला भावलेले चित्र आपल्या कवितेतून व्यकत झाल्याचे सांगून आपल्या काव्यसंग्रहास वाचकांनी जो प्रतिसाद दिला तो कायम असावा असे सांगून यापुढे असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. महाजन यांनी या देशात सध्या सुरू असलेल्या विविध घटनांचा आढावा घेवून कवियत्री स्नेहा कदम यांच्या काव्यसंग्रहाचा समग्र आढावा घेतला. व स्त्रीया म्हणून कशा सामाजिक मर्यादा येतात हे सांगून आद्य कवियत्री जनाबाई ते आधुनिक पज्ञा पवार, आशा कांबळे ते स्नेहा कदम या नव्या दमाच्या कवींच्या कवितांचा आढावा घेतला व स्नेहाच्या कविता विद्रोहाची किल्लीच असल्याचे स्पष्ट केले. तरूण वयात येवढे सामाजिक भान असणं याबाबत गौरवोद्गारही काढले.
अध्यक्ष पदावर बोलताना सुनिल हेतकर यांनी सम्यक साहित्य संसदेच्या सुरू असलेल्या साहित्यिक वाटचालीचा आढावा घेवून नव्या दमाच्या साहित्यिक व कवींना प्रोत्साहन मिळण्यासाठी संस्थेच्या सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी राजेश कदम यांनी स्नेहाचा काव्यसंग्रह म्हणजे प्रसन्न वातावरणातील निळी पहाट असल्याचे स्पष्ट केले. प्रा. सिमा हडकर यांनी स्त्री अंर्तमनाच्या हाक देणाऱ्या सजग कवितांचा हा काव्यसंग्रह असल्याचे गौरवोद्गार काढले. डॉ. शरयु आसोलकर यांनी कोकणची परंपरा, स्त्रीयांमधील असलेले कवितांचे स्थान व आजच्या आघाडीच्या युवा कवियत्री स्नेहा कदम यांचा परस्पर असलेला संबध स्पष्ट करीत स्नेहाच्या काव्यसंग्रहात संवादाची अनेकरूपे कशा पध्दतीने प्रकट होतात हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिध्दार्थ तांबे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्नेहा कदम यांनी तर पाहुण्यांची ओळख राहुल कदम यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक पवार यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले. व आभार विठ्ठल कदम यांनी केले.
यावेळी डॉ. जी. ए. बुवा, प्रभाकर भागवत, डी. के. पडेलकर, सुभाष गोवेकर, अरूण नाईक, कल्पना मळये, अरूण पणदूरकर, संतोष सावंत, राजेश मोंडकर, मोहन जाधव, अभिमन्यू लोंढे, अंकुश कदम, दिपक पटेकर, शितल परब, किशोर वालावलकर, मनोहर परब, स्नेहल फणसळकर, महेश पेडणेकर, प. ध. माणगांवकर, रमेश कदम, रामचंद्र वालावलकर, शेलेस्तीन शिरोडकर, प्रभाकर जाधव, प्रकाश चव्हाण, भावना कदम यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!