कनकनगर येथील श्रावणी शिखरे हिचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार

दहावी परीक्षेत ९८ टक्के गुणांसह एस.एम हायस्कुल प्रशालेमधून श्रावणीचा द्वितीय क्रमांक

       आमदार वैभव नाईक यांचे शालेय आणि कौटुंबिक मित्र कणकवली कनकनगर येथील हर्षद शिखरे  यांची कन्या कु. श्रावणी  शिखरे हिने १० वी च्या परीक्षेत ९८ टक्के गुण संपादन करून  एस.एम हायस्कुल प्रशालेमधून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.याबद्दल आज आमदार वैभव नाईक यांनी तिच्या घरी भेट देऊन  शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्रावणीचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, रुपेश आमडोस्कर, सचिन आचरेकर यांसह श्रावणीचे आई, वडील,आजोबा,काका व शिखरे कुटूंबीय उपस्थित होते.
error: Content is protected !!