शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर जिल्हा दौऱ्यावर

सावंतवाडी प्रतिनिधि
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. ६ जून २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सकाळी 9.35 वा. मोपा विमानतळ येथे आगमन (मा. मुख्यमंत्री महोदयांच्या स्वागतासाठी). सकाळी 9.45 वा. मा. मुख्यमंत्री महोदयांचे मुंबईहून आगमन, मोपा विमानतळावरुन मा. मुख्यमंत्री महोदयांसमवेत मोटारीने जयप्रकाश चौक, सावंतवाडीकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. सावंतवाडी शहर व मतदार संघातील विविध विकास कामांचा भूमीपूजन सोहळा व लोकार्पण सोहळा (मा. मुख्यमंत्री महादेयांच्या शुभहस्ते) स्थळ:- जयप्रकाश चौक, सावंतवाडी. सकाळी 11.15 वा. राखीव (स्थळ- श्रीधर अपार्टमेंट, सावंतवाडी). सकाळी 11.30 वा. श्रीधर अपार्टमेंट, सावंतवाडी येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण. दुपारी 12 वा. शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ-कुडाळ हायस्कूल, कुडाळ). दुपारी 2 वा. कुडाळ हायस्कूल, कुडाळ येथून मोटारीने मा. मुख्यमंत्री महोदयांसमवेत वेंगुर्ला कडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वेंगुर्ला येथील निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 3.15 वा. वेंगुर्ला येथून मा. मुख्यमंत्री महोदयांसमवेत मोटारीने चिपी विमानतळाकडे प्रयाण. सायं. 4 वा. चिपी विमानतळ जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव.





