कणकवली बार असोसिएशन ला ई-फायलिंग साठी अद्ययावत उपकरणे

ॲड.संग्राम देसाई, व उपाध्यक्षांचे मानले कणकवली बार च्या वतीने आभार
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या कडून घोषित झाल्याप्रमाणे ई-फायलिंग साठी आवश्यक सुविधा या मध्ये कॉम्प्युटर स्क्रीन, प्रिंटर, स्कॅनर, पॉवर सप्लाय अशी अद्ययावत उपकरणे कणकवली तालुका बार असोसिएशनला देण्यात आली.
सदर सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांना तसेच त्यासाठी युद्ध पातळीवर पाठपुरावा करणारे ॲड.संग्राम देसाई, उपाध्यक्ष बीसीएमजी यांचे आभार कणकवली बार असोसिएशन च्या वतीने मानण्यात आले. यावेळी ॲड. विद्याधर चिंदरकर,ॲड.उमेश सावंत ,विरेश नाईक,अनिल बर्वे, अध्यक्ष, राजेश परुळेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य,विलास परब,स्वप्नील सावंत, सचिव,मिलिंद सावंत,मनोज रावराणे,अक्षय चिंदरकर,स्नेहा रासम उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली





