झाला गवळदेव ‘पंढरीनाथ’ !
श्री गवळदेव ऋग्वेद संहिता स्वाहाकार सोहळा
उद्या चक्री भजनाचा महासंग्राम
निलेश जोशी । कुडाळ : कुडाळच्या श्री देव गवळदेवच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री गवळदेव मित्र मंडळाच्या वतीने ऋग्वेद संहिता स्वाहाकार याग सोहळ्याला १ फेब्रुवारीपासून सुरुवात झालीय. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयॊजन करण्यात आलं आहे. आज सुद्धा हजारो भाविकांनी श्री गवळदेवाच दर्शन घेतलं.
बुधवारी पहिल्या दिवशी रात्री सायंकाळी आरती झाल्यांनतर श्री जगन्नाथ संगीत विद्यालय महेश सावंत प्रस्तुत १२५ पखवाज वादन कार्यक्रम संपन्न झाला. एकाचवेळी १२५ पखवाजवादकांनी आपल्या वादनाने सर्वाना मंत्रमुग्ध केलं. या सर्वांचा श्री गवळदेव मित्र मंडळाच्या वतीने गौरव देखील करण्यात आला. त्यामुळे मंदिर परिसरातील वातावरण फार प्रसन्न झालं आहे.
आज या धार्मिक सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा विविध धार्मिक कार्यक्रम सकाळपासूनच सुरु होते. सकाळी साडेसात वाजता स्थापित देवता पूजन, ऋग्वेद शकाल संहिता स्वाहाकार, दुपारी नैवेद्य, आरती आणि तीर्थप्रसाद झाला. दुपारी ४ ते ६ या वेळात अष्टवधान सेवा संपन्न झाली. त्यामुळे फार प्रसन्न वातावरण तयार झालं होत. सायंकाळी ७ वाजता आरती करण्यात आली. आज श्री गवळदेव महाराजांना झाला महार पंढरीनाथ या वेशभूषेत सजवण्यात आलं होत. महेश राऊळ यांनी गवळदेव महाराजांचं हे मनमोहक रूप साकारलं होत. पंढरीनाथाच्या या वेषातल्या श्री देव गवळदेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. रात्री ८ वाजता हरी भक्त पारायण राजू मुंडले यांचं सुश्राव्य कीर्तन झालं.
उद्या ३ फेब्रुवारीला इतर धार्मिक कार्यक्रमांसोबतच सायंकाळी ७.३० वाजता चक्रीभजनांचा महासंग्राम रंगणार आहे. यामध्ये बुवा रुपेश परब, वडखोल, डामरे कणकवलीचे बुवा चिन्मय सावंत, ताम्बुलीचे बुवा अमित तांबुलकर शंभरी होणार आहेत.. त्यांना पखवाज विशारद आनंद मोर्ये हे पखवाज वर तर तेंडोलीचे आबा मेस्त्री हे तबल्यावर साथ करणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक राजा सामंत करणार असून सर्वंनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री गवळदेव मित्र मंडळाचे अध्यक्ष दादा पडते आणि उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रशांत राणे यांनी केलं आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.