कोंढेतड – राजापूरच्या नृत्य स्पर्धेतून पिंगुळीची मृणाल सावंत अव्वल

ब्युरो । कुडाळ : श्री गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या श्री गणेश मंडळ, कुवळेकरवाडी कोंढेतड ता. राजापूर आयोजित खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत पिगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली
श्री गणेश मंडळ, कुवळेकरवाडीच्या वतीने आयोजित या स्पर्धेत दुसरा क्रमांक पूर्वा  मेस्त्री हिला तर तिसरा क्रमांक ऋत्विक सनगरे याना मिळाला. उत्तेजनार्थ म्हणून आशिष पाटील,  नेत्रा आंबेकर, अनिकेत पास्ते, साक्षी राणे, संस्कृती गवस  यांची निवड करण्यात आली.  स्पर्धेचे परीक्षण – रोहित इंगळे मुंबई  आणि विशाल तागडे नागपूर यांनी केले.   स्पर्धेत सिंधुदुर्ग रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातील 17 स्पर्धक सहभागी झाले होते यावेळी कोंढेतड गावच्या सरपंच सौ मनाली जितेंद्र तुळसावडे, श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कुवळेकर( ग्रामस्थ मंडळ), विजय कुवळेकर (मुंबई मंडळ), सचिव – प्रकाश शिंदे , मुकेश कुवळेकर. खजिनदार – मुकुंद सावंत, दिलीप नलावडे. सदस्य – परशुराम सावंत, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते. विजेत्यांना रोख रक्कमेची पारितोषिके व भव्य चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!