६ फेब्रुवारी रोजी कणकवलीत लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

समानवता ट्रस्ट व संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांचा उपक्रम

कणकवली : दिवसेंदिवस अनेक आजारांचे प्रमाण मोठ्याप्रमाणे लहान मुलांमध्येही अधिक प्रमाणात दिसत आहे. अज्ञान व आर्थिक परिस्थितीमुळे तपासणी आणि उपचार न करण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील व्याधीग्रस्त मुलांना चांगले उपचार मिळावेत म्हणून या शिबिराचे आयोजन केलेले आहे.
हर्निया, हायड्रोसील, अनडिसेंडेड टेस्टीस व सरकमसिजन (सुन्ताचे ऑपरेशन) अशा अॅापरेशनला १५,०००/- ते २५,०००/-रुपये खर्च येणाऱ्या शस्त्रक्रिया समानवता ट्रस्ट सिंधुदुर्ग व संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांच्या मार्फत मोफत होणार आहेत. या अनुषंगाने तपासणी शिबिर सोमवार 06 फेब्रुवारी 2023 रोजी संजीवनी हॉस्पिटल कणकवली येथे सकाळी ९ ते सकाळी ११ या वेळेत आयोजित केलेले आहे. सदर तपासणी शिबिर व होणाऱ्या शस्त्रक्रियाही पूर्णपणे मोफत आहेत. सदरच्या शस्त्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टरांसमवेत मुंबईतील प्रसिद्ध बाल शल्यचिकीत्सक डॉ. राजीव रेडकर यांच्याकडून होणार आहेत. सदर मोफत तपासणी शिबिर व मोफत शस्त्रक्रिया यांचा लाभ सिंधुदुर्गवासियांनी घ्यावा असे आवाहन समानवता ट्रस्टचे सचिव कमलेश गोसावी आणि संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. विद्याधर तायशेटे यांनी केले आहे. सदर शिबिरासाठी 9421237887 या क्रमांकावर नोंदणी करावी.

सीतराज परब / कोकण नाऊ / कणकवली

🚨 अत्यंत तातडीची विनंती – आमची झेना हरवली आहे 🚨
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.
error: Content is protected !!