कणकवली बालगोपाळ हनुमान मंदिरात शुक्रवारी शनैश्चर जयंती

प्रतिवर्षाप्रमाणे बालगोपाळ हनुमान मंदिर, कांबळी गल्ली कणकवली येथे शुक्रवार १९ मे रोजी शनैश्चर जयंती साजरी होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स. 8 ते 8.30 श्री शनी महाराज पूजन, तिर्थप्रसाद, स.8.30 ते 1 भक्तगणांमार्फत एकादशणी, अभिषेक, सायं. 5 ते 7.30 भजनांचा भरगच्च कार्यक्रम, रात्री 8.30 महाआरती नंतर शनी महाराज जप. एकादशणीकरीता राजेश कांदळकर 8097950505, गणपत मालंडकर 9503004918, शशांक बोर्डवेकर 9890818170 यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी. तसेच या उत्सवाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन बालगोपाळ हनुमान मंदिर कणकवली यांनी केले आहे.
कणकवली प्रतिनिधी





