“प्रतापगडावरील भवानी मातेला साडे तीन किलोचे चांदीचे छत्र अर्पण सोहळा”

किल्ले प्रताप गडावर श्रीभवानी देवीस दि. १७ मे बुधवारी सकाळी छत्र अर्पण करून रायगडावरील ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचा शुभारंभ होणार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यंदा साडे तीनशे वर्ष होत आहे. हा सोहळा १ व २ जून रोजी किल्ले रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला महाराष्ट्र सरकार व श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड. साजरा करणार आहे. गेली २८ वर्ष सातत्याने ही संस्था रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा तिथीनुसार होणारा शिवराज्याभिषेक करत आहे.
या वर्षी ३५० राज्याभिषेक सुरू होणार या राज्याभिषेक सोहळ्याची सुरवात किल्ले प्रतापगडावर भवानी मातेला साडेतीन किलो चांदीचे छत्र अर्पण करून होणार आहे. अशी माहिती समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली आहे.
बुधवार दिनांक १७ मे रोजी किल्ले प्रतापगडावरील भवानी मातेला महाराष्ट्र सांस्कृतिक मंत्रालय व शिवराज्याभिषेक समिती यांच्या वतीने रजतछत्र अर्पण सोहळा आयोजित केला आहे.
सोहळ्यास असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी –
इ.स. १६७४ साली छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याचे ठरल्यावर रायगडावर सर्व तयारी सुरु झाली होती. महाराज वैशाख कृष्ण एकादशीस प्रतापगडावर आले. भवानी देवीची षोडशोपचारार्थ पूजा आराधना केली. आणि सव्वा मण सुवर्णाचे छत्र त्यांनी देवीस अर्पण केले. भवानी देवी वर महाराजांची नितांत श्रद्धा होती. प्रतापगडावर आई भवानी देवीच्या सानिध्यात तीन दिवस महाराज व्रतस्थ राहिले होते.
अश्या या ऐतिहासिक प्रसंगाची स्मृती जागवावी तसेच ते स्मृतीपुष्प आई भवानीच्या चरणी अर्पण करावे असा मानस ठेऊन समिती ने शासानापुढे हा विषय मांडला होता. त्या समितीच्या संकल्पास महाराष्ट्र सांस्कृतिक मंत्रालयाकडून त्वरित चांगला प्रतिसाद मिळाला. साडेतीन किलोचे छत्र बनवुन श्रीभवानी देवीस अर्पण करावे असे मा.सांस्कृतिक मंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यंच्याकडून सूचित करण्यात आले. त्याप्रमाणे दिनांक १७ मे २०२३ रोजी बुधवारी सकाळी हे रजत छत्र अर्पण सोहळा करण्यात येणार आहे.
श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्या माध्यामातून हे शुभकार्य होणार आहे.
हा रजत छत्र अर्पण सोहळा मा.सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुगंटीवार आणि मान्यवर तसेच समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते श्रीभवानी देवीची पूजा करून रजतछत्र अर्पण केले जाणार आहे.





