मंगळवारपासून आंब्रड येथे श्री देव महापुरुष देवालय जीर्णोद्धार कलशारोहण सोहळा

मंगळवार दिनांक 16 मे रोजी पासून आम्ब्रड तालुका कुडाळ येथे श्री देव महापुरुष जीर्णोद्धार ,कलशारोहण सोहळा, प्राणप्रतिष्ठापना सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न होत आहे.
धिंदबाळेवाडी प्रासादिक भजन मंडळ मुंबई व स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने हा भव्य धार्मिक सोहळा होत आहे.
मंगळवार 16 मे 2023 रोजी कलशारोहण सोहळा आंब्रड गावचे पुरोहित विष्णुशास्त्री करंबळेकर यांच्या शुभहस्ते सकाळी दहा ते दुपारी 31 पर्यंत होणार आहे.
दुपारी एक ते तीन महाप्रसाद ,सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ हरिपाठ, रात्री नऊ ते बारा या वेळेत हेळेकर दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडी करीिवडे यांचा” विधी लेख “हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे “भावअंतरीचे” फेम हार्मोनियम वादक मयूर गवळी हे या प्रयोगाचे आकर्षण असणार आहेत.
बुधवार 17 मे रोजी सायंकाळी सात ते नऊ सुस्वर भजन. धिंदबाळेवाडी प्रासादिक भजन मंडळ आंब्रड यांच्यावतीने सादर केले जाणार आहे . रात्री नऊ ते बारा या वेळेत जिल्हास्तरीय भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिवसांच्या या श्री देव महापुरुष देवालय जीर्णोद्धार कलशारोहण सोहळ्याचा आनंद भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कुडाळ ब्युरो न्यूज





