पराभव लागल्याने केविलवाणे आरोप

महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ शिवाजी पवार यांचा आरोप
पराभव दिसू लागला की मेंदूच्या गाभाऱ्यात कुजके विचार येतात. याची ही प्रचिती आहे. जो उमेदवार आम्ही जून्या पेन्शन साठी संपात उतरलो नाही म्हणतात्. तर शंका येते की तेच संपात होते किंवा कसे ?
आमची केंद्रप्रमुख संघटना पहिल्या दिवसापासूनच संपात होती याचे फोटोसह पुरावे आहेत . ते जरा बघा.
तू आमच्या उमेदवाराचे नाव घेऊन अपप्रचार करतोस ही तुझ्या खचलेल्या मनाची लक्षणे विचारवंतांना सांगण्याची गरज उरलीच नाही. ती तूच दाखवून दिलीस . धन्यवाद !
जर तुझ्या पॅनेलमधून आम्ही केंद्रप्रमुख उमेदवारी घेऊन लढलो असतो तर तुला हा मुद्दा आठवला असता काय?
तुझ्या संघटेचे जिल्हा स्तरीय सर्व नेते केंद्रप्रमुख संघटना अध्यक्ष श्री . शिवाजी पवार यांच्याकडे युतीसाठी का आले होते?तुमच्याशी युती केली असती तर तर चालले असते. याला काय म्हणायचे उगाच स्वतःचे बौध्दिक दारिद्रय लोकांना दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न थांबवा. पतपेढीच्या हिताचे vision मतदार बंधु – भगिनींना पटवून द्या. कारण निवडणूक लढविणारे सर्वच उमेदवार हे शिक्षण क्षेत्रातले जाणकार असून , मतदाता ही उच्च विभुषीत , प्रज्ञावंत आहेत.
पातळीसोडून प्रचार करणाऱ्या तुमच्या सारख्या खचलेल्या उमेदवाराचा ते का विचार करतील ?
याचे आत्मपरीक्षण करा. आणि तरीही तुला आम्ही संपात होतो की ‘ नव्हतो हे जाणून घ्यायचे आहेच तर उद्या १३ तारीखला तुमच्या हितचिंतकांची सभा लावून आम्हाला सांगा . आम्ही येतो तुमच्या सर्व शंकांचे समाधान करतो . नसेल तर हे नसते उदयोग थांबवा व तुम्ही सुध्दा भाग्यलक्ष्मी पॕनललाब् मतदान करा. नाहितर जे परिणाम होतील त्याला सामोरे जा.
अध्यक्ष सचिव महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ सिंधुदुर्ग.