मळेवाड जकात नाका येथे बसविण्यात आला बहिर्गोल आरसा

वाढते अपघात रोखण्यासाठी व्यापारी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य

सावंतवाडी : मळेवाड जकात नाका येथील व्यापारी संघटनेमार्फत वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर मळेवाड जकात नाका येथे अपघाताची दाट शक्यता लक्षात घेता येथून सातार्डाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला खास येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा अपघात टाळण्यासाठी बहिर्गोल आरसा (ट्रॅफिक कॉन्वेक्स मिरर) बसविण्यात आला आहे.
व्यापारी संघटना अध्यक्ष पांडुरंग गावडे, उपाध्यक्ष रमाकांत नाईक यांनी फित कापून या सेवेचा शुभारंभ केला. यावेळी येथील व्यापारी बंधू उपस्थित होते. या आरशामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग गावडे व उपाध्यक्ष रमाकांत नाईक यांनी सांगितले. व्यापाऱ्यांच्या सहकार्याने बसविलेल्या या आरशामुळे वाहनधारकाकडून समाधन व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!