गोळीबार प्रकरणातील संशयितांना 9 मे पर्यंत पोलीस कोठडी

आचरा–
गुरुवारी सायंकाळी आचरा येथे झालेल्या गोळीबार व चाकू हल्ला प्रकरणी आचरा पोलीसांनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे,वापर करणे,शिवीगाळ करणे,मारामारी करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करत घटनास्थळावरुन पिस्तूल, गोळ्या, चॉपर, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल MH 03 EA8447 जप्त केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आचरा देवगड रोडवर रामेश्वर मंदिर फाट्याजवळ गुरुवारी झालेल्या गोळीबार प्रकरणी यात हल्ला झालेले गौरव पेडणेकर यांचा जबिब घेतला गेला .याबाबत
आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यात जखमी झालेल्या गौरव पेडणेकर राहणार (आचरा वरचीवाडी) याने घटनेची फिर्याद आचरा पोलीस ठाण्यात दिली असून त्याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे कीं दुपारी दोन वाजता काम आटपून आपण आचरा तिठ्यावर आलो असता गर्दी दिसली म्हणून जवळ जाऊन पहिले असता जगदीश तुकाराम पांगे व तौकीर काझी तसेच डोंगरेवाडी येथील सचिन दुखंडे यांच्यामध्ये चिंगूळ प्रकल्पाच्या करणा वरून वाद चालू होता यावेळी जगदीश पांगे यांनी सचिन दुखंडे यांना धमकी दिली त्यावेळी मी व इतरांनी यावेळी मध्यस्थी करत वाद मिटवला. मात्र त्यानंतर मी व किशोर शिर्के व इतर सायंकाळी 5.25 च्या दरम्यान लौकिक हॉल वरून कारने पारवाडी येथे जात होतो यावेळी दुपारच्या भांडणच्या रागातून तौकीर काझी, शुभम जुवाटकर, यांनी करच्या समोर दुचाकी आडवी घालून आमची कार अडवली व आम्हाला शिव्या घालत मारहाण करत माझ्यावर चॉपरने वार केला वार चुकवण्यासाठी मी डावा हात वर केल्याने माझ्या डाव्या हाताला इजा झाली यावेळी मी कारमधून खाली उतरत असताना जुवाटकर याने माझ्यावर रिव्हाल्वर रोखून गोळी झाडली असता गोळी चुकवण्यासाठी खाली बसलो त्यानंतर जुवाटकर याने शिर्के याला टार्गेट करत त्यावर गोळी झाडली त्याचा नेम चुकल्याने शिर्केला गोळी लागली नाही त्यानंतर शुभम जुवाटकरने महेश मुळये यावर गोळी झाडली त्याने आपला बचाव केल्याने त्याला गोळी लागली नाही. शुभम जुवाटकर त्याच्याकडील रिव्हाल्वर पुन्हा झाडु नये म्हणून किशोर शिर्के व महेश मुळ्ये यांनी शुभम याला प्रतिकार केला असता शुभम त्यांच्या पासुन दूर पळुन गेला. त्याचवेळेस किशोर शिर्के व महेश मुळ्ये या दोघांनी प्रतीक हडकर याला पकडुन ठेवले शुभम जुवाटकर आचरा तिठ्याच्या दिशेने पळून जात होता किशोर शिर्के यांनी मोठमोठयाने ओरडुन त्याला पकड़ा पकडाअसा आरडा ओरडा केला असता त्याला स्थानिकांनी पकडले असल्याचे आपल्या फिर्यादित म्हंटले आहे.
आचरा पोलिसांनी पंचनामा करत रिव्हाल्वर, चॉपर दुचाकी केली जप्त
घटनेनंतर आचरा पोलिसांनी प्रत्यक्ष घटना स्थळाची पाहणी करून पंचायादी करून हल्ल्यात वापरलेले दुचाकी वाहन तसेच फायरिंग केलेले रिव्हाल्वर, रिव्हाल्वर च्या गोळ्या तसेच हल्ल्यात वापरलेला चॉपर आचरा पोलिसांनी जप्त केला आहे. गोळीबार व चाकू हल्ल्याप्रकरणी आचरा पोलिसांनी शुभम जुवाटकर (रा. दांडी-मालवण), तौकिर काझी (आचरा काझीवाडा), प्रतीक हडकर (रा. चिंदर सडेवाडी) या तिघांविरोधात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल केला असून हडकर व काझी या दोन संशयितांना अटक करण्यात आली. दरम्यान, हल्लाप्रकरणातील मुख्य सूत्रधार शुभम जुवाटकर याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याने अटकेची कारवाई करण्यात आली नाही. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर जुवाटकर याला अटक करणार असल्याची माहिती आचरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.
चौकट
मालवण न्यायालयाने तीनही संशयित आरोपींना मंगळवार ९ मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड. तुषार भणगे यांनी काम पाहिले.