राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोकण विभाग अध्यक्ष प्रा. एकनाथ तारमळे कुडाळमध्ये

कुडाळ : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोकण विभाग अध्यक्ष प्रा. एकनाथ तारमळे हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. यावेळी प्रा. एकनाथ तारमळे यांनी ओबीसी समाजातील विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
ओबीसी कोकण विभागीय अध्यक्ष प्रा. एकनाथ तारमळे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांनी स्वागत केले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी जिल्हाप्रमुख आनंद मेस्त्री, कोकण विभाग नेते काका कुडाळकर, वैश्य समाजाचे सुनील भोगटे, चर्मकार समाजाचे नेते नंदन वेंगुर्लेकर, कुंभार समाजाचे चंद्रकांत कुंभार, आनंद कुंभार, कुडाळ नगरपंचायत नगरसेवक उदय मांजरेकर, मच्छीमार संघटनेचे नेते तांडेल, भंडारी समाजाचे नेते राजू गवंडे, अतुल बंगे, नितीन वाळके आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!