कोकण नाऊ महोत्सव सावंतवाडीच्या कामाचा श्रीफळं वाढवून जिमखाना मैदान येथे शुभारंभ.

दिनांक ११ मे ते २१ मे २०२३ या कालावधीत रंगणार “कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सव.”

तालुक्यातील लोककलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे कोकण नाऊ चे आव्हाहन.
संपर्क-9370440893.
8408929923.

सावंतवाडी/प्रतिनिधी.

ऐतिहासिक सावंतवाडी शहरात कोकण नाऊ चॅनल आयोजित “कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सव 2023” हा दिनांक 11 मे ते 21 मे 2023 या कालावधीत होत आहे. या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम अर्थातच सांस्कृतिक,धार्मिक,शैक्षणिक अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात सावंतवाडी शहरवासीयांना अनुभवता येणार आहे. कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सव 2023 हा महोत्सव जिमखाना मैदान सावंतवाडी येथे होत असून या महोत्सवाच्या कामाचा शुभारंभ कोकण नाऊ चॅनलचे संचालक विकास गावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नुकताच करण्यात आला.या महोत्सवामध्ये सुमारे 200 हून अधिक विविध प्रकारचे खरेदी विक्रीचे स्टॉल देखील लावण्यात येणार आहेत.त्यामध्ये गृहपयोगी वस्तू,देश विदेशी खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शन, विविध नामांकित टू व्हीलर फोर व्हीलर कंपन्यांच्या गाड्यांची विक्री व प्रदर्शन तसेच या महोत्सवाच आकर्षण म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत “मनोरंजन नगरी” अशा एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाच नियोजन देखील करण्यात आलं आहे. या संपूर्ण महोत्सवामध्ये खेळ पैठणीचा,पपी-कॅट-डॉग-शो,रेकॉर्ड डान्स स्पर्धा,गायन स्पर्धा,मिस सिंधुदुर्ग स्पर्धा,ऑर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेल आहे.या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करावा असे आवाहन कोकण नाऊ चॅनलकडून करण्यात येत आहे.
संपर्क क्रमांक-9370440893.
8408929923.

error: Content is protected !!