हळवल फाटा येथे ट्रक पलटी होत पुन्हा अपघात
हायवे ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरण निद्रिस्त
प्रशासनाच्या विरोधात पुन्हा एकदा कणकवलीकरांनी एकवटण्याची गरज
महामार्गावर हळवल फाटा येथे गेली अनेक वर्ष सातत्याने अपघात होत असताना प्रशासन व हायवे ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका आजही वाहनचालकाला बसत आहे. हळवल फाटा येथील अवघड वळणावर आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मालवाहक ट्रक पलटी होत यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. असून त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वळणावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. होती. परंतु सुस्तावलेल्या प्रशासनाला जाग केव्हा येणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक अनिल जाधव, श्री. उबाळे, पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, हवालदार पांडुरंग पांढरे, हवालदार सागर मासाळ, होमगार्ड सुमित वारंग, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नितीन म्हापणकर आदींनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
दिगंबर वालावलकर /कणकवली