कणकवली तालुक्यात काल रात्रीपासून खंडित असलेला विद्युत पुरवठा अद्यापही सुरू नाही

कणकवली तालुक्यात महावितरण चा भोंगळ कारभार समोर

उपकार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची उदासीनता पुन्हा एकदा समोर

नळ योजना बंद: नागरिकांचे पिण्याच्या पाण्यापासून हाल

कणकवली तालुक्यात खारेपाटण फिडर लाईन ला काल रात्री उशिरा निर्माण झालेला दोष आज दुपारी 11 वाजता आले तरी अद्याप शोधून काढण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले नाही. त्यात करून महावितरण चे उपकार्यकारी अभियंता श्री. बगडे यांच्यासह संबंधित वायरमन हे देखील नॉट रीचेबल असल्याने वीज ग्राहकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. काल पासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने काही गावांमध्ये नळ योजनेसह पिण्याच्या पाण्यासाठी देखील नागरिकांचे हाल झाले आहेत. दरम्यान याबाबत उपकार्यकारी अभियंता बगडे यांच्याशी सातत्याने संपर्क साधला असता त्यांनी कोणताही रिप्लाय दिला नसल्याने महावितरणच्या कामाचा भोंगळ नमुना देखील या निमित्ताने समोर आला आहे. दरम्यान याबाबत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी संबंधितांवर कारवाई करणार का? असा सवाल सर्वसामान्य ग्राहकांमधून उपस्थित केला जात आहे. उन्हाळ्याचे दिवस असताना उष्णतेचा पारा वाढलेला असताना देखील काल रात्रीपासून आज 11 वाजत आले तरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश येत नसल्याने महावितरणच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत असून, याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे.

दिगंबर वालावलकर/ सिंधुदुर्ग

error: Content is protected !!