विजयदुर्ग व सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाकरिता तात्काळ उपाय योजना करा

आमदार रवींद्र फाटक व जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आरमाराची स्थापना करण्यासाठी निवडलेल्या सिंधुदुर्ग व विजयदुर्ग या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व आहे. सदर सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांची मोठ्या प्रमाणात झीज होऊन पडझड झालेली आहे. या दोन्ही किल्ल्यांना मी व स्थानिक शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळी यांच्या सोबत २७ एप्रिल २०२३ रोजी भेट देऊन सदर किल्ल्यांची पहाणी केली.
सदर किल्ल्यांच्या समुद्राकडील मागील बाजुच्या तटबंदीस मोठ्या प्रमाणात तडा गेल्याने भविष्यात तटबंदी कोसळून पाणी आत शिरुन किल्ल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा व आरमाराचा जिवंत इतिहास जपणाऱ्या किल्ल्यांचे संवर्धन होऊन त्यांची जपणूक करण्याची व हे किल्ले पर्यटनासाठी खुले करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ मंडळींकडून करण्यात आलेली आहे. जेणेकरून पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल व त्यांचा आर्थिक विकास होईल यासाठी महाराष्ट्र शासना तर्फे व पुरातन विभागाकडून सदर सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांचे तातडीने संवर्धन करण्यासाठी आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार रवींद्र फाटक यांच्या सह जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने बैठक घेण्याच्या सूचना पर्यटनमंत्र्यांना दिल्या ची माहिती कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी दिली. यावेळी श्री परुळेकर देखील उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!