वरवडे नदीपात्रात एका युवकाचा बुडून मृत्यू

कणकवली तालुक्यातील वरवडे येथील घटना

कणकवली शहरापासून नजीकच असलेल्या वरवडे येथील गडनदी पात्रातील मोठया खडकावर बसून तीन युवक मोबाईल मधून सेल्फी घेत होते. अचानक त्यातील एका युवकाचा पाय घसरल्याने तो खोल पाण्यात पडून बुडाला आहे.रात्री उशिरापर्यंत पोलिस तसेच नागरिकांनी शोध घेऊनही तो सापडला नव्हता.
कणकवली येथिल एका नातलगाकडे दोन युवक केरळ येथून आले होते. त्या नातलगाचा मुलगा तसेच ते दोघे युवक असे तिघे बुधवारी सायंकाळी वरवडे येथे गेले. गडनदी पात्रातील एका मोठ्या खडकावर ते तिघे बसून सनसेटचे फोटो घेत होते. तसेच मोबाईल मधून सेल्फी घेत होते. एवढ्यात त्या तिघांपैकी कणकवली येथील नातलगाच्या मुलाचा पाय घसरला.त्यामुळे तो खोल पाण्यात बुडाला.शोध घेऊनही तो न सापडल्याने अखेर कणकवली पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस निरीक्षक अनिल जाधव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तेथील नागरिकांच्या मदतीने त्या युवकाला शोधण्याची मोहीम राबविण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो युवक सापडला नव्हता.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!