छत्रपती शिवाजी महाराज चौकातील “त्या” महिलेला दिला आधार

भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली या महिलेची दखल

सविता आश्रमाच्या संदीप परब यांनी दाखवली माणुसकी

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी गेले काही दिवस विमनस्क स्थितीत असलेल्या एका महिलेला भाजपाचे शहराध्यक्ष आण्णा कोदे व त्यांच्या सहकाऱ्यानी आधार देत सविता आश्रमात पाठवले. गेले काही दिवस ही महिला या ठिकाणी विमनस्क स्थितीत होती. तिला होणारा त्रास पाहून भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी याबाबत संदीप परब यांच्याशी संपर्क साधला. तसेच याबाबत पोलिसांना कल्पना दिली. व त्यानंतर आज सायंकाळी सविता आश्रमाचे संदीप परब यांचे सहकारी रुग्णवाहिका घेऊन कणकवलीत शिवाजी चौकात दाखल झाले. व तिथून त्या महिलेला सविताश्रम येथे पाठवण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे सोशल मीडिया जिल्हाप्रमुख समीर प्रभूगावकर, अभय घाडीगावकर, निखिल आचंरेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!