कले सोबत मैत्री ही समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली- अभिनेते निलेश पवार.

पालकांनी मुलांना बुद्धीनिष्ठ बनवणे काळाची गरज.

जिल्हा प पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगाव नंबर एक शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न

कणकवली : जिल्हा प पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगाव नंबर एक शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न झाले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. मुलकनी देखील सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
झपाट्याने बदलणाऱ्या काळाची पावले ओळखत चंगळवादाच्या आहारी न जाता पालकांनी मुलांना बुद्धिनिष्ठ आणि कला सक्त बनवणे ही काळाची गरज आहे. त्यातूनच गुणवान आणि सशक्त मूल्य रुजवणारी पिढी निर्माण होऊ शकते. मिळालेल्या कौतुकाचं आत्मविश्वासात रूपांतर करून गुरुजन यांनी दाखवलेला रस्त्याचा हमरस्ता विद्यार्थ्यांनी बनवावा आणि आपल्या शिक्षकांच्या आणि पालकांच्या घामाचे गुलाब पाणी बनवावं असं मनोगत पुढे निलेश पवार यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केले तसेच मुख्याध्यापक किशोर कदम यांच्या कामाचे कौतुक केले शाळेने स्पोर्ट्स डे त्यानंतर ट्रॅडिशनल डे वेगळ्या पद्धतीने साजरे केले. यासाठी स्पोर्ट्स डे साठी विवेक परब यांस कडून गोल्ड मेडल व सिल्वर मेडल विद्यार्थ्यांना देण्यात आले.
विलिस सरांचा सत्कर करण्यात आला. मुख्याध्यापक किशोर कदम यांना कविता लेखन स्पर्धेस
एकता कल्चर काव्य पुरस्कार मिळाल्या बद्दलयांचे अभिनंदन करण्यात आले
यावेळी निलेश पवार व अध्यक्ष सुप्रिया अपराध सरपंच सुप्रिया कदम उपसरपंच गुरुदास सावंत शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत ऍड तुषार परब विलास परब तंटामुक्ती अध्यक्ष प्रदिप तळेकर पोलिस पाटील संजना आगणे विवेक परब घोरपडे मॅडम बबली राणे आणि शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम राजश्री तांबे ,वीलीस चौडणेकर संतोष राणे उपस्थित होते.

मयुर ठाकूर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!