कणकवलीतील प्रफुल्ल कामत यांचे निधन

भाजपा माजी महिला तालुकाध्यक्ष गीतांजली कामत यांना पतीशोक

कणकवली : कणकवली शहरातील जुन्या काळातील व्यापारी व जळकेवाडी येथील रहिवासी प्रफुल्ल गोविंद कामत (वय ६९) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी 7.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भाजपाच्या माजी महिला तालुकाध्यक्ष गीतांजली कामत यांचे ते पती तर समर्थ झेरॉक्स सेंटरचे सुशील दळवी यांचे ते सासरे होत.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!