हळवल गणपती साना येथे ठाकरे शिवसेने मार्फत वनराई बंधाऱ्याचा शुभारंभ

मा.आ. वैभव नाईक यांच्या सहकार्याने हळवल मधील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उपक्रम
युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची देखील उपस्थिती
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख,माजी आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याने आणि हळवल गावातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने हळवल गणपती साना येथे गडनदी पात्रात आज जेसीबीच्या सहाय्याने भराव टाकून वनराई बंधारा बांधण्यात आला. माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बंधाऱ्याचा शुभारंभ करण्यात आला. बंधाऱ्यात पाणी साठल्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हळवल गावाला या वनराई बंधाऱ्याचा मोठा फायदा होणार आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी वैभव नाईक आणि शिवसेना पदाधिकऱ्यांचे आभार मानले.
शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख राजू राठोड, राजू राणे, युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, कळसुली विभाग प्रमुख बबली राणे, ग्रा.प. सदस्य रोहित राणे, अनंत राणे,उत्तम राणे, गणेश राणे,सुभाष परब, श्याम तांबे, प्रभाकर चव्हाण, रवी परब, विजय परब, कमलाकर तांबे, प्रशांत परब,आप्पा ठाकूर, सुभाष राणे, निलेश ठाकूर, भाई तावडे, नंदू परब आदी शिवसैनिक व हळवल ग्रामस्थ उपस्थित होते.






