हिंदू कॉलनीत सुशोभित पथदिवे कार्यान्वित

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रहिवाशांना दिलासा

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून पर्यटन विकास सुविधेंतर्गत मंजूर करण्यात आलेले सुशोभित पथदिवे हिंदू कॉलनी येथे बसविण्यात आले. नगरसेविका संध्या तेरसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले.
या कामाचा शुभारंभ हिंदू कॉलनीतील रहिवाशांच्या उपस्थितीत श्री साईबाबांच्या चरणी श्रीफळ व पेढे अर्पण करून करण्यात आला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले पथदिव्यांचे काम पूर्ण होऊन दिवे तातडीने सुरू झाल्याने परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी श्रीधर गोरे, संजय आठले, भास्कर येळेकर, प्रसाद तेरसे, सतीश वर्दम, प्रताप खामकर, रुपेश कावले, प्रकाश तेरसे, दीप्ती प्रभू, उमा येळेकर, स्वप्नाली साळगावकर, मंगेश शिरोडकर यांच्यासह हिंदू कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते.
पथदिव्यांचे काम मार्गी लावल्याबद्दल उपस्थित रहिवाशांनी पालकमंत्री नितेश राणे तसेच आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!