जानवली पोलीस पाटील मोहन सावंत यांना उत्कृष्ट व व आदर्श पोलीस पाटील पुरस्कार प्रदान

पोलीस पाटील संघटना व हनुमान मित्रमंडळ जानवलीच्या वतीने मोहन सावंत यांचा सत्कार

जानवलीचे पोलिस पाटील मोहन श्रीकांत सावंत यांना शासनाकडून उत्कृष्ट व आदर्श पोलिस पाटील पुरस्कार प्राप्त झाला आहे. याबद्दल त्यांना नुकताच पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलीस पाटील कणकवली तालुका संघटना व हनुमान मित्र मंडळ जाणवली यांच्या वतीने मोहन सावंत यांचा सत्कार करण्यात आला. मोहन सावंत हे गेली १८ वर्षे जानवली पोलिस पाटील म्हणून काम करत आहेत. गेल्या ४ वर्षापासून ते कणकवलीचेही प्रभारी पोलिस पाटील आहेत. तसेच त्यांनी तरंदळेचे प्रभारी पोलिस पाटील म्हणूनही काम केले आहे. प्रदीर्घ काळ त्यांनी निःस्वार्थपणे केलेल्या सेवेचा गौरव म्हणून त्यांना आदर्श पोलिस पाटील पुरस्कार प्राप्त झाला आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!