SIR अभियान यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी झटून काम करावे – सुशांत नाईक

SIR च्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यात विभागवार बैठका संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना कोळपे विभागप्रमुखपदी नरेंद्र खाडये, तर उपविभागप्रमुखपदी अमोल पांचाळ यांची निवड
मतदार यादी पुनर्रिक्षण (SIR) अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वैभववाडी तालुक्यात विविध जिल्हा परिषद मतदारसंघांतील BLA, शाखाप्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) उत्साहात संपन्न झाल्या.
या बैठकींना कणकवली विधानसभा प्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी उपस्थित राहून SIR अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत कायम राहावे आणि एकही पात्र नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी BLA यांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच मतदारांची माहिती अचूकपणे संकलित करून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश दिले.
या अंतर्गत कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघाची बैठक हेत येथे वसंत खानविलकर यांच्या निवासस्थानी, कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघाची बैठक बांधवाडी (कोकिसरे) येथे यशवंत गवाणकर यांच्या निवासस्थानी, तर लोरे जिल्हा परिषद मतदारसंघाची बैठक लोरे येथे लक्ष्मण रावराणे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.
बैठकीदरम्यान SIR अभियानातील कामाचा आढावा घेण्यात आला. मतदार यादी पुनर्रिक्षण प्रक्रियेतील आवश्यक बाबी, अर्ज भरण्याची पद्धत, कागदपत्रांची पूर्तता तसेच प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थित BLA व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सुशांत नाईक म्हणाले, “SIR फॉर्म मुदतीपूर्वी आपल्या BLA यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांचे फॉर्म भरून घ्यावेत. पक्षाचे BLA आणि शासकीय BLA यांच्यात प्रभावी समन्वय ठेवावा. SIR फॉर्मचे ९० टक्के काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित १० टक्के पात्र मतदारांपर्यंतही पोहोचून त्यांचे फॉर्म भरून घेण्यावर भर द्यावा. तसेच पक्षाचे BLA आणि शाखाप्रमुख यांनी जनतेपर्यंत अधिकाधिक पोहोचून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी काम करावे.”
या बैठकींना तालुका प्रमुख नंदू शिंदे, तालुका सचिव गुलजार काझी, उपतालुका प्रमुख रमाकांत मोरे, विभाग प्रमुख जितेंद्र तळेकर, युवासेना तालुका प्रमुख रोहित पावसकर, तालुका संघटक दिव्या पाचकुडे, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, वसंत खानविलकर, शिवाजी परब, योगेश गुरव, जगन्नाथ इंदुरकर, आनंद नानलसकर, राजेश तावडे, संदीप कोलते, चंद्रकांत आमरसकर, शंकर कोकरे, दीपक चव्हाण, उमाकांत राणे, मंथन सुतार, प्रकाश काकिये, दीपक आमरसकर, विश्वनाथ पवार, सुरेश पारये, मधुकर मुणगेकर, सखाराम दिवाळे, दत्ताराम राणे, नारायण गुरव, रवींद्र परबते, संतोष कडू, रणजीत रावराणे, रवींद्र रावराणे, देऊ मांजरकर, सुहास कडू, अनिल नरम, नेताजी व्हरकट, संतोष कदम, नितेश शेलार, अनिल कदम, सुनील पवार, स्वप्नील रावराणे, कौशल भावे, बाबाजी पाष्टे, दीपक मोर, शांतेश सुतार, सुयश रावराणे, सूरज पाटील आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, वैभववाडी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद मतदारसंघांतील पक्षाचे सर्व BLA तसेच सर्व शाखाप्रमुख या बैठकींना उपस्थित होते. त्यामुळे SIR अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक नियोजन व समन्वयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
याच बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना कोळपे विभागप्रमुखपदी नरेंद्र खाडये, तर उपविभागप्रमुखपदी अमोल पांचाळ यांची निवड जाहीर करण्यात आली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.






