फळ पिक विमा वंचित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाईचा लाभ द्या

पालकमंत्री नितेश राणेंचे विमा कंपनी ला आदेश
जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी वेधले वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बाबत लक्ष
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळ पीक विम्यातून मिळणारी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी शनिवारी सिंधुदुर्ग येथे स्कायमेट, कृषी विमा कंपनी यांची बैठक घेण्यात आली. नादुरुस्त असलेली हवामान मापन केंद्र दुरुस्त करण्यात यावीत, यासंदर्भातील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात, हवामान मापनाची सदोष माहिती व त्याचा तपशील याची पडताळणी करावी असे निर्देश दिले. सीएससी आयडी बंद झाल्यामुळे जे शेतकरी बागायतदार फळपीक विमा योजनेतील लाभापासून वंचित राहिले आहेत त्यामधील त्रुटी दूर करून विमा कंपन्यानी तो लाभ तरी द्यावा असे आदेश या बैठकीत देण्यात आले.
या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, स्कायमेट चे व्यवस्थापक संजय मोरे, कृषी विमा कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक अतुल झणके, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, आधी उपस्थित होते.






