कोमसाप कुडाळ शाखेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिकांचा गौरव

ना.बा. रणसिंग, रा.बा. खानोलकर, के. एल. फाटक, दादा मसके यांचा सन्मान

कुडाळ तालुक्यातील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळ शाखेच्या वतीने तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक ना. बा. रणसिंग, रा. बा. खानोलकर, कृष्णा उर्फ दादा मसके आणि के. एल. फाटक यांचा कुडाळ येथे सत्कार करण्यात आला.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळ शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात शाखा अध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक ना. बा. रणसिंग, रा. बा. खानोलकर, कृष्णा उर्फ दादा मसके आणि के. एल. फाटक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सुपारीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके आणि तालुकाध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर यांच्या हस्ते या ज्येष्ठ साहित्यतिकाना सन्मानित करण्यात आले.
यावेळी साहित्यिक ना.बा. रणसिंग यांनी मनोगत व्यक्त करून आपला सत्कार केल्याबद्दल कुडाळ शाखेचे आभार मानले. केवळ साहित्यिक लिहीत असले तरी अनेक विचारवंत आहेत जे लिहीत नाहीत पण चांगल्याप्रकारे व्यक्त होतात. त्यांना देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपली ४८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लवकरच ५० पुस्तके प्रकाशित होतील. तो सोहळा कोमसापच्या व्यासपीठावर व्हावा अशी अशी इच्छा त्यांची व्यक्त केली. रा.बा. खानोलकर, के. एल. फाटक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद पवार यांनी केले. सर्व साहित्यिकांचा परिचय मंगेश मसके यांनी करून दिला. प्रास्ताविक प्रा. संतोष वालावलकर यांनी केले. यावेळी डॉ. दीपाली काजरेकर, स्नेहा फणसळकर, वृंदा कांबळी, स्वाती सावंत, सुरेश पवार, डॉ. एस.टी. आवटे, मनोहर सरमळकर, निलेश जोशी, हर्षवर्धन खानोलकर, शंतनू खानोलकर, साईप्रसाद वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!