‘नीट’ परीक्षा घोटाळ्या विरोधात उद्या कुडाळात धरणे आंदोलन

ठाकरेसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे आयोजन

सोनम वायचुंग यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन

नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला. या घोटाळ्यामुळे देशातील लाखो मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. नैराश्यातून विद्यार्थ्यानी आत्महत्या केल्या. या सर्वाला जबाबदार असणारे शिक्षण मंत्री डॉ धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर सोमवार दिनांक २० जुलै रोजी सकाळी १०.३०वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व मनसेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजन नाईक,अभय शिरसाठ, शिवाजीराव घोगळे, जगन्नाथ गावडे.. यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, मॅग्नेस पुरस्कार विजेते श्री सोनम वायचुंग उपोषणाला बसले होते. त्यांना पोलीस बळाचा वापर करुन. शांततेत चालणारे उपोषण केंद्र सरकारने कोणतीही दखल न घेता चिरडले. देशात लोकशाही धोक्यात असुन, घटनेने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली सरकार करत आहे. त्यामुळे सोनम वायचुंग यांना पाठिंबा देण्यासाठी कुडाळ तालुका शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी मनसेच्या वतीने कुडाळ तहसील कार्यालयासमोर उद्या सोमवार दिनांक 20 जुलै रोजी ठीक साडेदहा वाजता धरणे आंदोलन आयोजित केले आहे. तरी विद्यार्थी, पदाधिकारी, कार्यकर्ते, यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजन नाईक, अभय शिरसाठ, शिवाजीराव घोगळे, जगन्नाथ गावडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!