जिल्ह्यात भंडारी समाज भवन उभारणे ही माझी जबाबदारी – पालकमंत्री नितेश राणे

जिल्हा भंडारी समाजाच्या वतीने निधी मागणीसाठी निवेदन
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी समाज भवन कुडाळ मध्ये व्हावे ही आपल्याकडे भंडारी समाजाने केलेली मागणी आपण पूर्ण करणारच असा शब्द सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज जिल्हा पदाधिकारी यांना पालकमंत्री ना नितेश राणे यांनी दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा भंडारी भवन व्हावे अशी मागणी जिल्ह्यातील भंडारी समाजाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या कडे केली होती. त्या मागणीचा पाठपुरावा पुर्ण करुन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला म्हणून जिल्हा भंडारी समाजाच्या वतीने आभार मानून भवनासाठी निधी देण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे म्हणाले कुडाळ येथील जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठीकाणी भुखंड मंजुर करुन गेले वर्षभर शासकीय यंत्रणा कामाला लावुन कायदेशीर सोपस्कार महसुल यंत्रणेने पुर्ण केल्याने आता राज्यशासनाकडे पाठपुरावा आपणं करणार असल्याचे ना राणे यांनी सांगितले.
यावेळी भंडारी समाजाचे अतुल बंगे आणि राजु गवंडे म्हणाले, कुडाळ येथे भंडारी समाजाचे भूषण मच्छिंद्र कांबळी नाट्य गृह बांधकाम झाले आहे. त्याला चालना देऊन उर्वरित काम पुर्ण करण्याचे आमदार निलेश राणे यांनी भरीव काम केले असल्याचे अतुल बंगे आणि राजू गवंडे यांनी सांगितले.
या वर्षी गणेशोत्सव काळात पालकमंत्री नितेश राणे यांची वेळ घेऊन भुमीपुजन सोहळा भव्य दिव्य स्वरुपात करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष श्री हेमंत करंगुटकर यांनी दिली तर जिल्ह्यातील भंडारी समाज हा पालकमंत्री नितेश राणे यांचा ऋणी राहील असे भंडारी समाजाचे जेष्ठ नेते लक्ष्मीकांत मुंडये यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष हेमंत करंगुटकर, कार्याध्यक्ष राजु गवंडे, जिल्हा सचिव हेमंत सावंत, जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी दीवाकर म्हाळवणकर, भंडारी समाजाचे नेते लक्ष्मीकांत मुंडये, शिक्षक नेते राजन कोरगावकर, कणकवली भंडारी समाजाचे निलेश गोवेकर, कसाल भंडारी समाजाचे मारुती वायंगणकर आदी उपस्थित होते.






