लिंगेश्वर विद्यालय, तुळसुली येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

रोटरी क्लब ऑफ कुडाळचा उपक्रम
रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने तालुक्यात तुळसुली येथील लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली या प्रशालेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना कागदापासून आकर्षक फुले व पुष्पगुच्छ बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला.
या कार्यशाळेमध्ये सौ अस्मिता परब यांनी उपस्थित सर्व मुलांना कागदापासून पुष्पगुच्छ व फुले बनविण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक, माजी अध्यक्ष रो. आनंद वेंगुर्लेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री भाटीवडेकर सर, विलास राठोड सर, रामदास गावडे सर, स्वरूप यादव सर, सौ तायशेटे मॅडम, सौ वारंग मॅडम तसेच इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये पुष्पगुच्छ व फुले बनविण्याचे शिकून घेऊन मुलांनी आपल्या कलागुणांमध्ये वाढ करावी आकर्षक फुले व पुष्पगुच्छ बनवून भविष्यामध्ये अर्थार्जनाची सोय करता येईल असे यावेळी अध्यक्ष रो मकरंद नाईक यांनी मुलांना सांगितले.






