शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे रुपेश पावसकर यांच्या हस्ते नेरूर येथे उदघाटन

नेरूर ठाकूरवाडी जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग इयत्ता चौथी व सातवी च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी आयोजित करण्यात आले आहेत. याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते विद्येची देवता शारदा मातेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वनाने करण्यात आले
यावेळी बोलताना रुपेश पावसकर यांनी चौथीपासूनच शिक्षणाचा पाया भक्कम करणे. सातवी, दहावी आणि बारावीच्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करणे गरजेचे आहे सांगून आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा परीक्षांचे महत्त्व पटवून दिले. तुमच्यातलाच कोणी कलेक्टर बनेल, कोणी IPS अधिकारी बनेल, कोण डॉक्टर बनेल असे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या वतीने शाळेच्या नियोजनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन रुपेश पावसकर यांनी दिले. सर्व विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करावी व आपले नावलौकिक करून इतरांसाठी आदर्श निर्माण करावा असे आवाहन करण्यात आले. केंद्राच्या वतीने तांबे सर यांच्या हस्ते रुपेश पावसकर यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी केंद्रप्रमुख तांबे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ सावंत, मुख्याध्यापक मनोज आटक, ग्रामपंचायत सदस्या सौ पावसकर ,शिक्षक समितीचे अध्यक्ष श्री आटक, श्री वारंग, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि शिक्षकवर्ग व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला. या शिबिरामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबद्दल योग्य दिशा मिळाली असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

error: Content is protected !!