स्पेलबी आणि इंग्लिश ग्रामर परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कुल वरवडे च्या विद्यार्थ्यांचे यश

नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पेलबी हॅन्ड रायटिंग स्पर्धेमध्ये ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या कु.वृषा दत्ता मठकर हिने राज्यात 1 ला क्रमांक तर देशात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. याच
स्पर्धेत तनया अनिकेत राणे तिसरी हिने राज्यात पाचवा तर देशात पंधरावा क्रमांक मिळवला, अभेद अनंत सावंत (आठवी ) याने राज्यात दहावा तर देशात 24 वा क्रमांक मिळवला आणि सिद्धी आनंद घाडी (आठवी) राज्यात दहावा आणि देशात 25 वा क्रमांक मिळवला आहे. तर इंग्लिश ग्रामर परीक्षेतही वृषा दत्ता मठकर हिने राज्यात 3 रा क्रमांक पटकावला आहे. या इंग्लिश ग्रामर परीक्षेत प्रशालेच्या भूमी विजय चिंदरकर व रणजीत शैलेश गावकर या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल,सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम सल्लागार श्री. डी. पी तानावडे सर मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी अभिनंदन केले आहे

error: Content is protected !!