नीट परीक्षेत संजय घोडावत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीचे राष्ट्रीय स्तरावर यश

मोहन भोसले 10 वा तर सार्थक पाटील 14 वा
संजय घोडावत IIT अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी NEET 2026 मध्ये ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमध्ये मोहनीश भोसले 705/720 गुणांसह ऑल इंडिया रँक (AIR) 10 वा, तर सार्थक पाटील 705/720 गुणांसह 14 वा रँक मिळवून राष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केले.
याबरोबरच साहिम पाटवेगार यांनी 690/720 गुणांसह AIR 106, श्रीवल्लभ गावडे यांनी 690/720 गुणांसह AIR 122, तर समीर जाधव यांनी 685/720 गुणांसह AIR 177 मिळवत संस्थेच्या यशात मोलाची भर घातली.
याशिवाय मोहनीश भोसले, सार्थक पाटील, साहिम पाटवेगार आणि समीर जाधव यांनी जीवशास्त्र (Biology) विषयात 360 पैकी 360 गुण मिळवत विशेष प्रावीण्य संपादन केले.विद्यार्थ्यांच्या या यशामागे संस्थेचे अनुभवी शिक्षक, नियोजनबद्ध अध्यापन, नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांसाठीची प्रभावी तयारी यांचा मोठा वाटा असल्याचे संस्थेने सांगितले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालक श्री. वासू, केंद्रप्रमुख श्री. गुप्ता तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.






