आचरा येथे २३ जुलै रोजी ठाकरे सेनेचे विद्यूत मंडळ कार्यालयास टाळा ठोको आंदोलन

वेळोवेळी लक्ष वेधून पत्रव्यवहार करुनही आचरा येथे विद्यूत मंडळ कार्यालयास अधिकारी नियुक्त करण्यात न आल्याने ठाकरे सेने तर्फे गुरुवार २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आचरा सबस्टेशनला टाळा ठोको आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. कार्यकारी अभियंता कणकवली यांना दिलेल्या पत्रात त्यांनी मालवण तालुक्यातील आचरा सब स्टेशन येथे दीर्घ काळापासून अधिकारी नसल्यामुळे नागरिकांना सातत्याने गंभीर वीज समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीज पुरवठ्यातील बिघाड, तक्रारींचे वेळेवर न होणारे निराकारण यामुळे वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.तसेच प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे .या गंभीर बाबींकडे आपले वेळोवेळी लक्ष वेधूनही, आपणास पत्रव्यवहार करून सुद्धा आपणाकडून कोणती दखल घेण्यात आली नाही त्यामुळे गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामस्थांना घेऊन आचरा वीज वितरण कार्यालय येथे कार्यालयास टाळे ठोको आंदोलन करणार असल्याचा
इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.






