पोईप हायस्कूल येथे योग प्राणायम शिबिर संपन्न

श्री सद्गुरु भक्त सेवान्यास माडयाचीवाडी (कुडाळ )या संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते
श्री 108 महंत मठाधीष प. पू . सद्गुरू श्री गावडे काका महाराज संस्थापीत श्री सद्गुरु भक्त सेवान्यास रजि माडयाचीवाडी (कुडाळ )या सामाजिक संस्थेच्या वतीने पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटीचे सौ इंदिराबाई दताञय वर्दम हायस्कूल पोईप या प्रशालेत आज योग प्राणायम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
सदर कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाली
यावेळी श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास संस्थेचे योग प्राणायाम शिक्षक श्री आनंद सावंत सर, संस्थेचे विश्वस्त साईप्रसाद पेडणेकर,मसदे मठाचे केंद्रप्रमुख तानाजी पाटील, उमेश मुणगेकर,सेवेकरी दादु गावडे, संतोष हिवाळेकर,व सौ कोमल पेडणेकर, आणि प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कुंभार सर, शिक्षक महाजनी सर,कारंडे सर ,चव्हाण सर,सौ सावंत मॅडम,सौ राऊळ मॅडम,लिपिक नंदकिशोर तावडे, शिक्षकेतर कर्मचारी विठोबा माधव,अभिजित धुरी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते
यावेळी या प्रशालेतील विद्यार्थ्यांना योगप्राणायम विषयी माहिती व प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले
तसेच या प्रशालेतेल इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी या वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाचे श्री श्री 108 महंत मठाधीष प. पू . सद्गुरू श्री गावडे काका महाराज संस्थापीत श्री सद्गुरु भक्त सेवान्यास रजि माडयाचीवाडी (कुडाळ )या सामाजिक संस्थेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले






