रोजगारासाठी देवगड मध्ये मोटार सायकल रॅलीचे आयोजन

पर्यावरणपूरक विकास व स्थानिक रोजगारासाठी युवकांना एकत्र येण्याचे आवाहन

फिरायला कोकणात यायचं, मग नोकरीसाठी कोकणाच्या बाहेर का जायचं?”

कोकणाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाच्या उद्देशाने ‘युवा कोकण’ यांच्या वतीने रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता दीर्बादेवी स्टॉप, जामसंडे येथे भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. “ही रॅली एकजुटीसाठी, युवकांच्या भविष्यासाठी” होणार आहे. युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या रॅलीचा मुख्य उद्देश पर्यावरणपूरक प्रकल्पांना पाठिंबा, स्वच्छ ऊर्जेचा प्रसार, हरित व समृद्ध कोकणाची निर्मिती आणि स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे. पर्यावरणपूरक विकास प्रकल्प हेच कोकणाच्या प्रगतीचे प्रभावी माध्यम ठरू शकतात, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
आयोजकांच्या मते, चुकीच्या अफवा व दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी न पडता युवकांनी जागरूक राहावे, विकासाच्या संधींचे स्वागत करावे आणि कोकणातील रोजगाराच्या संधी इतर राज्यांकडे जाऊ न देता स्थानिक युवकांनी त्याचा लाभ घ्यावा. त्यामुळे कोकणातील युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवून या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“फिरायला कोकणात यायचं, मग नोकरीसाठी कोकणाच्या बाहेर का जायचं?” हा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा या रॅलीमागील प्रमुख संदेश असून, “विकसित कोकण – समृद्ध कोकण” हे ध्येय समोर ठेवून ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.
युवक, नागरिक आणि विकासाभिमुख विचारांचे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जनजागृतीपर उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन युवा कोकण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!