कणकवली बस स्थानकामधील मोकळी जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी परिवहन मंत्री सकारात्मक

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेत केली मागणी

परिवहन मंत्र्यांकडून कणकवली बस स्थानकाची पाहणी

राज्य परिवहन मंडळाच्या कणकवली येथील बसस्थानक व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान परिसरातील अतिरिक्त मोकळी जागा नगरपंचायतीला भाडेतत्त्वावर उपलब्ध करून द्यावी. तसेच राष्ट्रीय महामार्गालगत असलेली मोकळी जागा नगरपंचायतीला व्यापारी तत्त्वावर वापरण्यास देण्यात यावी, अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौºयावर आले असता त्यांनी कणकवली बसस्थानकाला भेट देत परिसराची पाहणी केली. यावेळी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, वैभव मालंडकर, सुजित जाधव, संतोष पुजारी, सौरभ पारकर, निकीत मुरकर, अमेय पारकर, उमेश आरोलकर, प्रशांत अंधारी, संजय पारकर यांच्यासह विभाग नियंत्रक दीपक घोडे, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख, विभागीय यंत्र अभियंता सुजित डोंगरे, आगार व्यवस्थापक अजय गायकवाड विभागीय व आगार पातळीवरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पारकर यांनी मंत्री सरनाईक यांना निवेदन दिले. या जागेचा नियोजनबद्ध विकास करून व्यापारी संकुल उभारल्यास नगरपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. तसेच बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण, नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना देणे शक्य होणार आहे. दरम्यान, मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जागेबाबत माहिती घेत पाहणी केली. तसेच या मागणीबाबत सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!