मालवण तालुक्यात शिवसेनेला बळ; बांदिवडे गावात उत्साहात पक्षप्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास; बांदिवड्यात कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत बांदिवडेत शिवसेनेचा शक्तीप्रदर्शन सोहळा
काल मालवण तालुक्यातील बांदिवडे गावात शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गावातील अनेक ठाकरे सेना कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वावर, राज्यातील विकासकामांवर आणि सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेल्या निर्णयांवर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार मा. निलेशजी राणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. शिवसेनेच्या विचारसरणीवर विश्वास ठेवत अनेक युवक आणि ग्रामस्थांनी पक्षात प्रवेश करून आगामी काळात शिवसेना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जि. प. सदस्या सौ. वर्षा सांबारी, मालवण उपनगराध्यक्ष श्री. दीपक पाटकर, श्री. विनायक बाईत तसेच इतर पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शिवसेनेच्या वाढत्या जनाधाराबद्दल समाधान व्यक्त करत नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला असून, बांदिवडे गावातील या पक्षप्रवेशामुळे मालवण तालुक्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त करण्यात आली.





