घोडावत विद्यापीठातील 49 विद्यार्थ्यांची निवड

संजय घोडावत विद्यापीठातील AIML विभागातील ४९ विद्यार्थ्यांची पुणे येथील नामांकित FUEL संस्थेमार्फत आयोजित “Full Stack Web Development using Java” या इंटर्नशिप प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
उद्योगाभिमुख शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला प्राधान्य देणे हा या इंटर्नशिपचा हेतू आहे. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्राशी निगडित तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.
FUEL ही देशभरातील युवकांसाठी कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शन आणि रोजगारक्षम प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत अग्रगण्य संस्था असून हा उपक्रम CSR अंतर्गत विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यासोबतच FUEL संस्थेच्या सहकार्याने विद्यापीठ कॅम्पसमध्ये आधुनिक तंत्रज्ञान विषयांवरील विशेष प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगसज्ज बनण्यास मोठी मदत होणार आहे.
या उपक्रमासाठी डॉ. प्रियांका मोरे यांनी विशेष प्रयत्न केले असून विभागप्रमुख डॉ. संताजी शिंदे, डीन डॉ. विवेक कुलकर्णी, रजिस्ट्रार डॉ. कायंदे, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. युनिव्हर्सिटी प्रेसिडेंट संजय घोडावत,विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.





