कलमठ गाव अंधारात , वीज अधिका-यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक

सरपंच संदीप मेस्त्री यांच्या सहित ग्रामस्थांचा रात्री 2 वाजेपर्यंत वीज सुरु करण्याचा प्रयत्न

यापुढे ग्रामस्थांची गैरसोय सहन करणार नाही

महावितरण कंपनीकडून सोमवारी वीज वाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, त्यासाठी महावितरणकडून सकाळी 7.30 वाजता ते सायंकाळी 6 वाजण्याच्या कालावधी विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याची सुचना प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र, रात्री 8 वाजले तरी कलमठ गोसावीवाडी , बिडयेवाडीसह अन्य काही भागात विद्युत पुरवठा खंडीत होता. वीज कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी करत असलेले प्रयत्न असफल ठरत होते.अखेर सरपंच संदीप मेस्त्री यांच्या यांच्यासहित शेकडो ग्रामस्थांनी वीज वितरणच्या उपकेंद्रावर रात्री 12 वाजता धडक देत सहाय्यक कार्यकारी अभियंता संदीप पाटील यांना जाब विचारला . यापुढे ग्रामस्थांची गैरसोय सहन करणार नाही , असा इशारा श्री. मेस्त्री यांनी दिला आहे.
कलमठ गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने संतप्त झाल्याने सरपंच संदीप मेस्त्री यांच्या यांच्यासहित शेकडो ग्रामस्थांनी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास कणकवली येथील महावितरच्या उपकेंद्रावर धडक दिली. यावेळी पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, ग्रा.प.सदस्य अनुप वारंग,नितीन पवार, उपसरपंच दिनेश गोठणकर, सचिन खोचरे, निसार शेख, प्रणय शिर्के, चेतन पाटील, टिकू कांबळी, समीर रजपूत, सिद्धेश रजपूत, बाबू नारकर, नाना गोठणकर, सचिन पेडणेकर, संजय गुरव ,आकाश पाटील, बाबू पवार ,दादा लोकरे ,विकी रजपूत यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कनिष्ठ अभियंता श्री. तिरपुडे हे लाईनवर एवढा प्रॉब्लेम असून देखील का आले नाहीत ? वायरमन फक्त लाईन आणी फ्युज बदलून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कलमठ गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. त्याला जबाबदार कोण ? वरिष्ठ अधिकारी साईटवर यायला नको का? मुळात दिवसभर विद्युत पुरवठा खंडीत असताना या अडचणी कशासाठी अशी विचारणा ग्रामस्थांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता संदीप पाटील यांना केली. त्यावर श्री. पाटील यांनी कनिष्ठ अभियंता श्री. तिरपुडे यांच्याशी संपर्क साधत तातडीने फॉल्ट आहे तिथे जाऊन कोणत्याही परिस्थितीत वीज ग्राहकांची गैरसोय होवू देवू नका अशा सुचना केल्या. त्यामुळे रात्री 1 वाजेपर्यंत कलमठ गोसावीवाडी , बिडयेवाडी येथील ट्रान्सफार्मवर दुरुस्तीचे काम करण्यात आले.मात्र, काहीवेळानंतर पुन्हा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. मात्र, सकाळी लाईनवर तांत्रिक बिघाड शोधण्यासाठी वीज वितरणची सर्व यंत्रणा लागली होती. अखेर बिडयेवाडी परिसरात मेन लाईनवर 2 विद्युत लाईन एकत्र जोडत असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होत होता.अखेर सरपंच संदीप मेस्त्री यांच्या पाठपुराव्यामुळे सदर लाईन नव्याने ओढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.मात्र, विज वितरण विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. कालपासून वीजेचा लपंडाव सुरु आहे.

error: Content is protected !!