कणकवली आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे समृध्दी धुरी हिचा सत्कार

आर्ट ऑफ लिव्हिंग कणकवली यांच्या वतीने दहावीच्या परिक्षेत समृद्धी शंकर धुरी या विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीच्या विद्यार्थीनीने 98.20 टक्के गुण मिळवत प्रथम श्रेणीत गुण मिळकत यश मिळवले. त्याबद्दल कणकवली आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे समृध्दी धुरी हिचा सत्कार आ कणकवली आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून पेढे भरवत सत्कार करण्यात आला. यावेळी समृध्दी हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी ॲंड. राखी मालवणकर, पत्रकार भगवान लोके, मोहन काणेकर, पंढरीनाथ गुरव, समृध्दीचे वडील चार्टर्ड अकाउंटंट शंकर धुरी, आई पुजा धुरी व आर्ट ऑफ लिव्हिंगचा परिवारातील सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!