करंजेमधील पाच वाड्यांमध्ये पाणीटंचाईच्या कामांना सुरुवात

पालकमंत्री नितेश राणेंच्या आदेशानुसार 17 लाखांचा निधी प्राप्त

जि. प. सदस्य मनोज रावराणे, पं. स. सदस्य दिव्या पेडणेकर यांच्या हस्ते शुभारंभ

जिल्हा परिषद पाणीटंचाई निधी मधून करंजे गावातील 5 वाडीतील कामांना रविवार 17 मे रोजी सुरुवात करण्यात आली. हरकुळ जिल्हा परिषद मतदारसंघातील जि. प. सदस्य मनोज रावराणे, पं. स. सदस्य दिव्या पेडणेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार एकूण 17 लाख 33 हजार 865 रुपयांचा निधी यासाठी प्राप्त असून या कामांमुळे करंजेवासीयांना संभाव्य पाणीटंचाईपासून मुक्ती मिळणार आहे. सध्या मे महिना सुरू असून तीव्र उन्हाळ्यामुळे पाणीटंचाईची समस्या भेडसावू शकते. करंजे ग्रामस्थांच्या मागणीनुसार जि. प. सदस्य मनोज रावराणे, पं. स. सदस्य दिव्या पेडणेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून विशेष पाठपुरावा करून करंजे गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहीर, नळपाणीपुरवठा दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून घेतला. आपटेवाडी नळ योजनेची सार्वजनिक विहीर दुरुस्त करण्यासाठी 7 लाख 16 हजार 460 रुपये, सोनारवाडी आसरोंडकरवाडी न. पा दुरुस्ती साठी 2 लाख 31 हजार 240 रुपये, टेंबवाडी न. पा. दुरुस्तीकरीता 1 लाख 84 हजार 840 रुपये, साटम वाडी न पा दुरुस्तीसाठी 2 लाख 72 हजार 590 रुपये, सातोसेवाडी न. पा दुरुस्तीसाठी 3 लाख 28 हजार 735 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात सुरू करण्यात आलेल्या या विहीर दुरुस्ती आणि न. पा. कामांमुळे गावातील ग्रामस्थांना पाणीसाठा वाढून सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. यावेळी करंजे ग्रामपंचायत सरपंच सौ. सपना संदीप मेस्त्री, माजी सरपंच मंगेश सदानंद तळगावकर, माजी पंचायत समिती सदस्य राजू पेडणेकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस गणेश मंगेश तळगावकर, करंजे बूथ अध्यक्ष श्री. विठ्ठल नारकर, आपटेवाडीतील ग्रामस्थ मंगेश राणे, राजू परब, लाडू परब, रामचंद्र गायकवाड, विजय पाताडे, पुंडलिक राणे, रवी भोगले, राजू सावंत, प्रकाश सावंत, विजय घोणे, तुकाराम परब, सोनारवाडी येथील ग्रामस्थ अनंत चव्हाण, योगेश दळवी, शिवाजी सावंत, यश सावंत, रवींद्र नागवेकर, मोहन तळगावकर, विष्णू सावंत, संतोष सावंत, अनिल तळगावकर, टेंबवाडीतील ग्रामस्थ राजन चिंदरकर, वीरेंद्र परब, रवी घोणे, संजय घोणे, साटम वाडीतील गणपत साटम, भिकाजी शेळके, श्री. शिरसाट, श्री. कुवळेकर, शशी सावंत, अक्षय सावंत, शेळके मामा, सातोसेवाडीतील ग्रामपंचायत सदस्य रेणुका सातवसे, सदानंद सातवसे, आबा सातवसे, अण्णा सातवसे, पंढरी सातवसे, राजा सातवसे, रामचंद्र सातवसे, राजू सातवसे आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!